Family · Marathi

house husband part 1

Completed | Part 1 of 1 | 1 Likes

मी विकास विदर्भातील एका छोट्या गावात वाढलेला मुलगा. आमच्या कुटुंबात मी एकुलता एक. माझं संपूर्ण बालपण आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण गावाजवळच झालं. त्यामुळे बाहेरच्या जगाचा फारसा अनुभव नव्हता. आणि मी स्वभावानेही मी थोडा लाजरा आहे .ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मला पोस्टग्रॅज्युएशन करायचं होतं. म्हणून मी पुणे शहरात आलो. गाव सोडताना मन खूप भारी झालं होतं. पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर राहत होतो.
शहरात आलो तेव्हा मला कुणीच ओळखीचं नव्हतं. सुरुवातीला मी एका PG मध्ये राहायला लागलो. पण तिथलं जेवण चांगलं नव्हतं, त्यामुळे माझी तब्येत बिघडली. म्हणून मी एक भाड्याची रूम घेतली. त्या दिवसापासून आयुष्य थोडं बदलायला लागल.मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहायला आलो, तिथे
जवळजवळ २५० फ्लॅट्स होते. खूप लोक राहत होते. त्यात बरेच कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनीही होते. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं. रोज कॉलेजला जायचो, परत यायचो, स्वतः स्वयंपाक करायचो आणि झोपायचो. हळूहळू तब्येतही ठीक झाली.त्या अपार्टमेंटमध्ये आणि बसमध्ये रोज काही कॉलेजच्या मुली दिसायच्या. काही आमच्या कॉलेजच्याच होत्या. आम्ही सगळे एकाच बसने कॉलेजला जायचो. त्या मुली थोड्या खोडकर स्वभावाच्या होत्या.दररोज बसमध्ये त्या मला बघायच्या. मी गावाकडचा असल्यामुळे माझा ड्रेसिंग सेन्स साधा आणि थोडा जुन्या स्टाइलचा होता. मला हे सगळं जाणवायचं, पण मी खूप लाजरा असल्यामुळे कधी त्यांच्याकडे नीट बघायलाही धजावत नव्हतो. त्या बघत नसतील तेव्हाच मी चोरून
त्यांच्याकडे बघायचो. मुलींशी बोलायचं तर खूपच अवघड वाटायचं.असं करत करत तीन महिने गेले. एक दिवस त्या मुलींपैकी एका मुलीचा वाढदिवस होता. ती बसमध्ये सगळ्यांना चॉकलेट वाटत होती. माझ्याकडे आली आणि म्हणाली,“आज माझा बर्थडे आहे, चॉकलेट घे.”मी चॉकलेट घ्यायला हात पुढे केला, तर तिने हात थांबवला आणि म्हणाली,“पहिले मला wish कर, मग मी चॉकलेट देईन.”मी wish करायचा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर आला नाही. इतक्यात तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्याभोवती जमल्या. मला खूप भीती वाटत होती. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होतो, पण आवाजच निघत नव्हता. शेवटी त्यांनी हसत हसत मला चॉकलेट दिलं आणि पुढे गेल्या.त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा मी बसस्टॉपवर जायचो, काही मुली माझ्यामागे येऊन मला चिडवायच्या, हसत बोलायच्या. मला खूप वाईट वाटायचं. लाज, भीती आणि संकोच यामुळे मी इतका अस्वस्थ झालो की मी पूर्ण एक आठवडा कॉलेजलाच गेलो नाही.त्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती — काव्याएक दिवस मी बाहेर ग्रोसरी घ्यायला गेलो होतो. तेव्हा तिने मला पाहिलं आणि माझ्याजवळ आली. मला भीती वाटली, पण ती म्हणाली, “घाबरू नकोस… सॉरी.
काव्य: आम्ही जे केलं त्याबद्दल सॉरी. मला माहिती आहे, आम्ही तुला चिडवल्यामुळे तू कॉलेजला येणं बंद केलं होतंस. आता आम्ही तसं कधी करणार नाही. आम्हाला वाटलं तू मजेत घेणार, पण तुला किती लागलं असेल हे आम्हाला कळलंच नाही.
मी: मी फक्त “थँक्स” म्हटलं.
काव्या: माझं नाव काव्या… तुझं?
मी: विकाश.
काव्या: गुड. चला फ्रेंड्स होऊया?
मी: ठीक आहे… बाय.
काव्या.:उद्या कॉलेजला ये. मिस करू नकोस.
मी: ओके.
दुसऱ्या दिवशी मी बसस्टॉपवर गेलो, तर सगळे बसची वाट पाहत होते. मला बघून काही जण “हाय” म्हणाले. मी खाली मान घातली. बसमध्येही तसंच झालं.मी कॉलेजला जायचो, परत यायचो. असं एक आठवडा गेला.
एक रविवार मी वॉकला बाहेर पडलो. तेव्हा ते सगळे व्हॉलीबॉल खेळत होते. काव्या ने मला पाहिलं आणि माझ्याजवळ आली.
“विकाश, तू पण खेळायला ये ना,” ती म्हणाली.
मी “नको” म्हटलं.ती माझ्यासोबत चालायला लागली.
मी म्हणालो, “तू जा ना खेळायला.”
ती म्हणाली, “तू इतका लाजरा का आहेस? आम्ही ही नॉर्मल लोक आहोत.”
मी म्हणालो, “सॉरी… पण मला मुलींशी बोलायला खूप लाज वाटते.”
काव्या म्हणाली, “अरे वर बघ, एकदा माझ्या चेहऱ्याकडे तरी बघ.”
मी खालीच बघत होतो.
ती म्हणाली, “कोणी बघितलं तर वाटेल की तु मुलीसारखा वागत आहेस.”
मी हसत म्हणालो, “मी मुलगाच आहे… फक्त स्टेज आहे.” आणि मी थोडा पुढे चालू लागलो.
एका कोपऱ्यात तिने मला थांबवलं. मला थोडी भीती वाटली.
ती म्हणाली, “घाबरू नकोस… मी तुला काही करणार नाही. मी फक्त पुन्हा सॉरी म्हणायला आले.”
मी म्हणालो, “पुन्हा का सॉरी?”
ती म्हणाली, “आता मी तुला थांबवलं, हाताला स्पर्श केला ना.”
मी हसून “ठीक आहे” म्हटलं.
ती म्हणाली, “फायनली तू नॉर्मल होत आहेस.”
मी म्हणालो, “एक विचारू का?”
ती म्हणाली, “हो, विचार.”
मी विचारलं, “तू नेहमी पॅन्ट-शर्टच का घालतेस? मी तुला कधी ड्रेसमध्ये पाहिलं नाही.”
ती हसली, “म्हणजे तू मला ऑब्झर्व्ह करतोस?”
मी म्हणालो, “हो… पण दूरून.”
ती म्हणाली, “मला पॅन्ट-शर्ट घालायला आवडतं. त्यात कम्फर्टेबल वाटतं. आणि माझ्या घरी कोणी पुरुष नाही आहे. मी आणि माझी आईच. लहानपणापासून मी अशीच वाढले.”
मी म्हणालो, “सॉरी.”
ती म्हणाली, “कशासाठी?”
मी म्हणालो, “तुझ्या बाबांबद्दल.”
ती म्हणाली, “इट्स ओके. तुला पॅन्ट-शर्ट घालणाऱ्या मुली आवडत नाहीत का?”
मी म्हणालो, “नाही, तसं नाही… खरं तर मला आवडतात.”
ती हसली, “ओह, गुड. तू आता कुणासोबत राहतोस?”
मी म्हणालो, “मी इथे एकटाच राहतो,” आणि माझी सगळी स्टोरी तिला सांगितली.
ती म्हणाली, “मग जेवण कसं करतोस?”
मी म्हणालो, “मला स्वयंपाक करता येतो. घरी आई थकली असेल तर मी बनवायचो. आता इथेही करतो.”
ती म्हणाली, “अरे वा! तू स्टडी, कुकिंग, क्लिनिंग, कपडे धुणं सगळं करतोस? ग्रेट यार! मी कॉलेजमधून आले की कपडे बदलते, शॉर्ट्स-टीशर्ट घालते आणि बाहेर खेळायला जाते.”असं बोलता बोलता एक तास गेला.
मी म्हणालो, “मी आता रूमवर जातो.”
ती म्हणाली, “अरे मला कॉफीला बोलावणार नाहीस का?”
मी म्हणालो, “तू मुलगी आहेस… ठीक आहे का?”
ती म्हणाली, “तूच मुलीसारखा घाबरतोयस. काही होणार नाही.”
मी हसून म्हणालो, “चल, माझी कॉफी टेस्ट कर.”
आम्ही रूमवर गेलो. ती खुर्चीवर बसली. मी कॉफी बनवली.
ती म्हणाली, “रूम खूप स्वच्छ आहे. कोणी साफ करायला येतं का?”
मी म्हणालो, “नाही, मीच सगळं करतो.”
ती म्हणाली, “म्हणजे तुला घर नीट ठेवायला ही येतं.”
कॉफी पिऊन तिने कप खाली ठेवला.
मी कप उचलून बेसिनजवळ ठेवला.
ती हसून म्हणाली, “माझ्या कपात उरलेली कॉफी टेस्ट करू नकोस.”
मी हसून म्हणालो, “तू खूप नॉटी आहेस.”
ती म्हणाली, “ठीक आहे, मी जाते. नंतर भेटू.”
ती गेल्यावर मी कप धुताना तिच्या बोलण्याची आठवण आली… आणि तिच्या कपात उरलेली कॉफी मी चाखली.
खूप छान लागली.लहानपणापासून मला रोल रिव्हर्सल आवडतं, पण ते कधी बाहेर आलं नव्हतं. आज तिच्याशी बोलल्यानंतर मला खूप आनंद वाटत होता.पुढचा आठवडा तसाच गेला. मी कॉलेजला जायचो, पण तिच्याशी
फारसं बोललो नाही.शनिवारी वॉकला गेलो तेव्हा ती पुन्हा भेटली. आम्ही थोडं बोललो.तिने मला तिच्या घरी येण्यासाठी बोलावलं.
मी म्हणालो, “मी येईन…”मी रूमवर आलो आणि उद्या तिच्या घरी कसं जायचं, कसं वागायचं याचा विचार करत बसलो. थोडी नर्व्हसनेस होती.
दुसऱ्या दिवशी मी तयार झालो आणि तिच्या घरी गेलो.
काव्या : “विकाश, आत ये… बाहेर का उभा आहेस?”
मी आत गेलो. तिची आई (आंटी) आली आणि विचारलं,“कसा आहेस? कुठून आलास?” अशा नॉर्मल गोष्टी.ती पण खूप चांगली होती. आम्ही पटकन मिक्स झालो. मी आंटीशी छान बोललो. माझ्या नम्रपणामुळे आंटीला मी लगेच आवडलो.लंच झाल्यावर मी भांडी साफ करायला मदततिला गेलो.
आंटी: “अरे विकाश, काय करतोयस? राहू दे, मी करते.”
मी: “नाही आंटी, मला येतं. घरीही मी करतो.”
आंटी: (हसत) “मला तुझा अॅटिट्यूड आणि हंबलनेस आवडला. बघ काव्या … ती बसलीय, एक कामही करत नाही.”
काव्या: “तुला माहिती आहे ना मम्मी मी कशी आहे. हवं असेल तर त्याला सांगा, तो कुकिंगही करतो.”
आंटी: “अरे विकाश, तुला स्वयंपाकही येतो?”
मी: “हो आंटी, मला कुकिंग आणि क्लिनिंग दोन्ही आवडत.”
काव्या: “हो, त्याचं घर खूप क्लीन आहे. तु जर पाहिल तर तुला लाज वाटेल.”
आंटी: “आपलं घर मेस आहे ते तुझ्यामुळेच.”
मी: “नाही आंटी, तुमचं घर खूप छान आहे. डेकोरेशनही सुंदर आहे.”
आंटी: “तुला डेकोरेशन आवडलं? हे सगळं मीच घेतलंय. काव्या काही लक्ष देत नाही. तिचं पुढे कसं होईल याची मला काळजी वाटते.”
काव्या: “आई, तु का टेन्शन घेत आहे? मला असा कुणीतरी मिळेल ना जो घर सांभाळेल… मी बॉससारखी राहीन.”
आंटी: “असं चित्रपटात होत बाई , खर्‍या आयुष्यात नाही.”
भांडी साफ केल्यानंतर आम्ही बसून एक मूव्ही पाहिली. मग मी माझ्या रूमवर परतलो.त्या रात्री मला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. मनात विचार आला — जर शक्य असेल तर मी काव्या साठी house husband होऊ शकलो असतो. तिच्याबद्दल माझ्या भावना वाढत होत्या. मला वाटू लागलं की ती माझ्यासाठी जणू “female husband” आहे.पूर्वी मी स्वप्नात नेहमी विजयशांतीसारखी स्ट्रॉंग वूमन imagine करायचो… पण आता ती जागा काव्या ने घेतली होती.त्या रात्री मला झोपच आली नाही. मी काव्या, तिची आई आणि माझ्या future बद्दल विचार करत राहिलो.शेवटी कधी तरी झोप लागली…

Congratulations!

You've successfully completed reading all published parts of this story!

2052 Views 0 Comments
Disclaimer

CD Stories is a multilingual open platform. Stories published are generated by writers. The platform has not reviewed, modified, or validated contents and holds no liability regarding content quality or copyright infringements.

Discussion (0)

No comments shared yet. Be the first to share your thoughts!
Want to comment? Please Login or Sign Up.
Reading preferences
100%
Home Discover 0 Alerts Writers Login