house husband 2

Savrali

  | February 18, 2026


In Progress |   0 | 1 |   262

Part 1

दुसऱ्या दिवसापासून मी रोज कॉलेजला जायचो आणि परत यायचो.एक दिवस परत येताना मला आंटी ऑफिसमधून येताना दिसल्या.
मी: “कशा आहात आंटी?”
आंटी: “मी ठीक आहे विकाश.”आम्ही दोघं मिळून ग्रोसरी घ्यायला गेलो. त्या बघत होत्या मी कसं सामान घेतोय. मी सगळं नीट तपासून, भाव करून, जसं घरातल्या बायका करतात तस.खरेदी करून आम्ही परत येत होतो. अचानक एक ऑटो आला आणि आंटीला धडकला. त्या खाली पडल्या.मी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यांच्या पायातुन रक्त येत होतं. डॉक्टरांनी बँडेज केलं आणि म्हणाले,“काळजी करायची काही गरज नाही, पण एक महिना यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. यांना कोणते ही काम करू देऊ नका .”
मी त्यांना घरी आणलं. सगळं व्यवस्थित ठेवलं. मग मी काव्याला फोन केला.
ती आली आणि आईला बघून थोडा वेळ रडली.त्या वेळेत मी किचनमध्ये जाऊन जेवण बनवलं. प्लेट्स काढल्या आणि आंटी व काव्याला जेवायला दिल.
आंटी: “अरे विकाश, तू हे सगळं का करतोयस? काहीतरी ऑर्डर केले असते ना.”
मी: “ठीक आहे आंटी. मला तरी स्वतःसाठी बनवायचंच असतं, मग आपल्यासाठी का नाही?”
आंटी: “विकाश, जेवण खूप छान झालंय. तुझ्या हाताला चव आहे. खूप धन्यवाद बाळा.”
मी: “काही नाही आंटी. पुढचा एक महिना तुम्ही माझ्या हातचं खाऊ शकता.”
आंटी: “नको रे, आम्ही करू.”
मी: “कसं कराल आंटी? तुम्ही चालूही शकत नाही एक महिना. आणि काव्याला हे सगळं येत नाही. मग कसं होईल? जेवण आणि घरकामाची सोय काळजी मी घेतो.”
आंटी: “नको विकाश, दोन बायका बसून आणि पुरुष त्यांच्यासाठी काम करतोय, हे बरं दिसत नाही.”
मी: “का नाही आंटी? तुम्ही अडचणीत आहात, मी मदत केली तर काय हरकत आहे? नकार देऊ नका.”
आंटी: “थँक यू विकाश. खरंच, काव्याला कुकिंग-क्लिनिंग येत नाही. घर सांभाळणं जमत नाही. थँक यू.”
मी: “काही नाही आंटी. प्लेट द्या. मला अजून खूप काम आहे. भांडी धुवायची आहेत, किचन आणि हॉल साफ करायचा आहे.”
आंटी: “काव्या, जा त्याला मदत कर.”
मी: “नको, मी करतो सगळं.”
काव्या: “खरंच?”
मी: “हो.”मी किचनमध्ये जाऊन भांडी धुतली, गॅस बंद केला, हॉल साफ केला. मग फळं कापून आंटी आणि काव्याला दिली.
आंटी: “अरे विकाश, हे फळंही तू का कापतोयस? हे काव्या करू शकते ना.”
मी: “ठीक आहे आंटी.”
आंटी: “विकाश, तुझे कपडे पूर्ण भिजलेत. तुला सर्दी होईल. काव्या, त्याला काही कपडे दे.”
मी: “नको आंटी, मी माझ्या रूमवर जाईन.”
आंटी: “का रे? तू इतकी मदत करतोयस. तू आता आमच्या घरातील एक मेंबर आहेस. काव्या नेहमी टी-शर्ट आणि शॉर्ट्सच घालते. तिचे कपडे घाल.”
काव्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स आणले.
मी रूममध्ये जाऊन माझे कपडे बदलले आणि ते घातले.ते कपडे मला व्यवस्थित फिट झाले. टी-शर्ट छातीला थोडा लूज होता, शॉर्ट्स ठीक होते.
काव्या माझ्याकडे न हलता बघत होती. मला लाज वाटत होती.मी म्हणालो, “ठीक आहे आंटी, मी आता जातो. उद्या सकाळी ब्रेकफास्ट बनवायला येतो.”
आंटी काहीतरी बोलणार होत्या, पण मी म्हणालो,“तुम्ही बरे होईपर्यंत काही बोलू नका.”
आंटी: “ठीक आहे. काव्या, त्याला रूमपर्यंत सोड.”
आम्ही रूमकडे चाललो.
मी: “काव्या, तू मला असं का बघतेयस?”
काव्या: “नाही, काही नाही. नॉर्मल आहे.”
मी: “नाही, काहीतरी वेगळं आहे. तुझे कपडे माझ्यावर चांगले दिसत नाहीत का?”
काव्या: “नाही, चांगले दिसतायत. खरं तर तू या कपड्यांत छान दिसतोस. मागून तर अजून.”
मी लाजलो.
“ठीक आहे, उद्या येतो,” मी म्हणालो.
काव्या: “नको रे, छोटा स्क्रॅच आहे. मी सांभाळते.”
मी: “नाही. मी येणार. पुढचा एक महिना सगळं करेन.”
काव्या: “तू माझं ऐकत नाहीस. तू खूप स्वीट आहेस. तुझा लाईफ पार्टनर खूप खुश असेल. आणि खरंच, तू या कपड्यांत खूप चांगला दिसतोस.”
मी हसून बाय म्हणालो.ती परत घराकडे गेली. जाताना तिने पॅकेटमधून सिगारेट काढली आणि ओढू लागली.मी खिडकीतून ते पाहिलं. मला थोडा शॉक बसला… पण आतून कुठेतरी आनंदही झाला.त्या आनंदातच मी झोपायला गेलो…मी तिला मागून बघत होतो, ती सिगारेट ओढत चालली होती. त्या क्षणी ती अगदी माझ्या लहान पणा पासूनच्या स्वप्नासारखी वाटत होती. माझ नेहमी role-reversalचं स्वप्न होतं… आणि आता ते खरंच घडत असल्यासारखं वाटत होतं. पुढे काय होईल ते पाहू, असं मनात आलं.
मी झोपायला गेलो. कपडे बदलून नाईट कपडे घातले. सकाळी 5 वाजता उठलो. अंघोळ करून फ्रेश झालो आणि काव्याच्या घरी गेलो.
साधारण 6:20 झाले होते.मी पोहोचलो तेव्हा काव्या अजून झोपलेली होती. मी बेल वाजवली. ती झोपेतच उठून दरवाजा उघडायला आली.
मला पाहून ती म्हणाली,“तू आधीच उठून रेडी झाला?”
मी: “किती वाजले गं? खूप काम आहे ना… उशीर होईल म्हणून आलो.”
मी आत गेलो. घर साफ केलं, ब्रेकफास्ट बनवला आणि आंटी व काव्यासाठी चहा केला.
पहिल्यांदा आंटीच्या रूममध्ये गेलो. त्या उठलेल्या होत्या आणि मोबाईलवर न्यूज पाहत होत्या.
मी: “आंटी, आता कसं वाटतंय?”
आंटी: “थोडं बरं आहे. बाहेर पेपर असेल, आणशील का?”
मी: “हो.”
मी पेपर आणून दिला.
आंटी: “थँक यू विकाश. तू खूप मदत करतोयस.”
मी: “तुम्ही तयार व्हा. ब्रेकफास्ट बनवलाय. मी काव्याला कॉफी देतो.”
कॉफी घेऊन तिच्या रूमकडे जाताना मला वेगळीच भावना आली… जणू बायको नवऱ्याला बेड कॉफी देत आहे तसं.
मी दार ठोठावलं.
ती म्हणाली, “दार उघडं आहे.”
मी आत गेलो.
मी: “काव्या, उठ… कॉफी पिऊन घे.”
ती उठली आणि मला पाहिलं. मी फ्रेश होतो, कपाळावर बोटू लावलेला.
ती हसली आणि म्हणाली,
“ठेव तिथे, मी पिते.”
मी: “सिगारेटसोबत प्यायची आहे का?”
काव्या: “श्श… काल पाहिलंस का? आईला सांगू नकोस. ती खूप ओरडेल.”
मी: “तिला आवडत नसेल तर सोड ना.”
काव्या: “पाहू. पण आज तुझ्या कॉफीसोबत सिगारेट मस्त लागेल. काय दिवस आले आहे यार… मुलगा मुलीसाठी बेड कॉफी आणतोय.”
ती पांढऱ्या बनियन आणि शॉर्ट्समध्ये होती. केस सैल होते.मला लाज वाटली, मी खाली बघितलं.
ती म्हणाली, “अरे वर बघ. इतका लाजतोयस का?”
मी बाहेर वळायला लागलो.
ती उठून पाय खाली ठेवले आणि चप्पल शोधत होती.
मी कोपऱ्यात चप्पल पाहिल्या. पटकन जाऊन तिच्या जवळ ठेवल्या.
ती थोडी शॉक झाली, हसली आणि चप्पल घातल्या.
“सिगारेट दे,” ती म्हणाली.
मी टेबलवरून सिगारेट देऊन दिली.
ती म्हणाली, “तुला माझ्या सवयी माहिती आहेत. थांब इथे, आई येईपर्यंत.”
काव्या: “तू इतका शांत का असतोस? तुझा अॅटिट्यूड आवडतो. कुकिंगही आवडतं.”
मी: “थँक यू.”
आंटी वॉशरूममधून आल्या.
मी म्हणालो, “ब्रेकफास्ट तयार आहे.”
काव्या: “काय केलं?”
मी: “उपमा.”
काव्या: “मला मदत करायला सांगणार होतास?”
मी: “तू करणार नाहीस हे मला माहिती आहे.”
काव्या: “गुड. तुला समजलंय. तू माझी चप्पल आणलीस तेव्हा मला कळलं… तू घरातल्या बाईसारखा सगळं करतोस.”
मी काही बोललो नाही.
ती म्हणाली, “काही नाही… जा ब्रेकफास्ट वाढ.”मी आंटी आणि काव्यासाठी ब्रेकफास्ट वाढला.त्यांनी तो खाल्ला.मी प्लेट्स साफ केल्या आणि मग किचन ही साफ केलं.नंतर आम्ही दोघं कॉलेजला गेलो.असं काही दिवस नॉर्मल चालू राहिलं…
To be continu.


Copyright and Content Quality

CD Stories has not reviewed or modified the story in anyway. CD Stories is not responsible for either Copyright infringement or quality of the published content.


|

Comments

No comments yet.