मी आणि माझे भाऊजी भाग ३
मी चहा बनवून परत बेडरूम मध्ये जाऊन चहाचे घोट घेत मासिक वाचू लागलो. आणि समोर कोणातरी खाकरण्याचा आवाज ऐकला आणि समोर पाहतो तर काय भाऊजी.......
माझ्या छाती मध्ये धस्स झाले होते मी रेड हॅन्ड लेडीस ड्रेसिंग मध्ये पकडलो गेलो होतो. मी उठून उभा राहिलो. आता पुढे काय होणार याचा विचार करून माझा जीव टांगणीला लागला होता.माझा घसा सुकला होता. माझे अंग अनामिक भीतीने थरथर कापत होते. आता भाऊजी काय बोलतील किंवा काय करतील याचा मला काहीच अंदाज येत नव्हता.
जयेश-अरे अमर हे काय ?
मी- भाऊजी.... तू..म्ही.. तर संध्याकाळी येणार होता ना (बोलताना माझे शब्द अडखळत होते)
जयेश- हो पण तू घरी एकटाच आहेस म्हणून हाल्फ डे सुट्टी कडून मी लवकर आलो
मी- भाऊजी ते मी.. (काय बोलावे हेच मला सुचत नव्हते)
जयेश- काय चालले आहे तुझं ? तू आणि हे लेडीस कपडे, काही समजते की नाही तुला?
मी- सॉरी भाऊजी (माझा चेहरा रडवेला झाला होता)
जयेश- काय सॉरी, तुला काही कळत की नाही असले धंधे सुरु आहेत तुझे.... (भाऊजी खूप रागात होते)
मी- सॉरी भाऊजी प्लिज कोणाला काही बोलू नका. मी परत असं काही करणार नाही (माझ्या डोळ्यातून आता पाणी ओघळू लागले होते)
जयेश- तुझ्या घरी आई- बाबा व तुझ्या ताईला सर्व सांगावे लागेल मला.
मी- भाऊजी प्लिज मला माफ करा मी या पुढे असे काही करणार नाही.
भाऊजी माझ्या शेजारी आले आणि बेडवर बसले मलापण त्यांनी बेडवर त्यांच्या शेजारी बसवले आणि माझ्या कडे पाहत भाऊजी बोलू लागले.
जयेश- ठीक आहे तू जर मला सगळं खरखर सांगितलंस तर मी नाही सांगणार कोणाला
मी - थँक यु भाऊजी, विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे ते
जयेश- अरे या वयामध्ये मुलींचे आकर्षण असते आणि तुझं हे काय?
मी- भाऊजी मला मुली आवडतात पण मला असं ड्रेसिंग करायला पण आवडत
जयेश- कधी पासून सुरु आहे तुझं हे सगळं.
मी- भाऊजी ४ वर्षे झाली ८वी मध्ये असताना एका नाटकामध्ये लेडीस रोल केला होता त्यानंतर सुरवात झाली. कदाचित मला मुलींचे आणि लेडीसचे कपडे आवडत असतील म्हणून असेल
जयेश- आणि कपडे मेक-अप वैगरे
मी- अगोदर ताई व आईचे वापरात होतो आता स्वतःचे आहेत.
जयेश- बाकी कपडे खूप व्यवस्थित नेस्ले आहेस तू ,बरीच प्रॅक्टिस केलेली दिसतेस
मी- हो घरी कोणी नसताना चान्स मिळाला की मी ड्रेसिंग करत होतो
जयेश- तू या ड्रेसिंग मध्ये अगदी तुझ्या अनुराधा ताई सारखाच दिसतोस
मी- थँक्स भाऊजी.
जयेश-मी तुझ हे गुपित कोणालाही सांगणार नाही पण तुला मी सांगतो तास करावे लागेल.
मी- काय भाऊजी?
जयेश-तू जेवढे दिवस इकडे राहशील तेवढे दिवस तुला २४ x ७ असच लेडी गेटअप मध्ये राहावे लागेल.
मी- भाऊजी पण कस काय शक्य आहे हे
जयेश- तसेही मला कोणी मेहुणी नव्हती सो आता मला माझी मेहुणी पण मिळाली, तू माझा मेहुणा नाही तर मेहुणी म्हुणुन इकडे रहा, चालेल ना.
मी- पण भाऊजी
जयेश- बघ तुला पण ड्रेसिंग करायला मिळेल आणि मला पण एक मेहुणी मिळेल नीट विचार कर आणि सांग मला. हि माझी विनंती समज हवे तर.
मी- ठीक आहे पण भाऊजी पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना
जयेश- मी कोणालाही काहीही सांगणार नाही.
मी- प्रॉमिस भाऊजी
जयेश-हो प्रॉमिस, मग तुझं लेडी नाव काय आहे ?
मी- भाऊजी मी ड्रेसिंग केलं कि स्वतःला आरोही हे नाव दिलंय
जयेश- छान आहे नाव अनुराधा ची छोटी बहीण आरोही.तुला आवडेल ना माझी मेहुणी बनून राहायला.
मी- हो भाऊजी पण हे आपले सिक्रेट असेल.
जयेश- हो आरोही, तू एकदम अनुराधा सारखीच दिसतेस ह, इव्हन तिच्यापेक्षा सुंदर
मी- थँक्स भाऊजी, तुमचं आपलं काहीतरीच (आता मला लाज वाटू लागली होती)
जयेश- बाकी काय काय आवडते तुला आरोही.
मी- ड्रेसिंग केल्यावर मला घरातील सर्व कामे करायला आवडतात.खास करून स्वयन्पाक,
जयेश-ओह .. म्हणजे घर अगदी नीट राहील तर
मी- हो आणि अजून एक, शेवंता मावशी उद्यापासून १५ दिवस कामाला येणार नाहीत
जयेश- का काय झाले.
मी-त्यांच्या मुलीचे बाळंतपण असल्यामुळे त्या येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
जयेश- आरोही मग एक कप चहा बनवशिल का माझ्यासाठी?
मी- हो बनवेन ना .
मी चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात आले मस्तपैकी दोन कप चहा बनवून परत हॉल मध्ये येऊन मी भाऊजींना चहा दिला
जयेश- चहा खूप छान झाला आहे ह आरोही
मी- थँक्स भाऊजी.
मी चहाचे कप आत नेले आणि परत बाहेर येऊन सोफ्यावर बसले भाऊजी पण फ्रेश होऊन परत सोफ्यावर येऊन बसले.
जयेश- तर आरोही आज आपण जेवण करायला बाहेर जाऊयात.
मी- भाऊजी मी असं ड्रेसिंग करून कधी बाहेर नाही गेले, मलातर बाई खूप भीती वाटतेय.
जयेश- तुला असं ड्रेसिंग करून बाहेर जायची इच्छा नाहीये का?
मी- माझी इच्छा तर आहे पण भीती खूप वाटतेय
भाऊजी-अग आरोही भिऊ नकोस मी आहे ना सोबत तुझ्या सो डोन्ट वरी.
मी जाऊन तयार झाले माझा मेकअप थोडा ठीक केला आणि मी व भाऊजी डिनर साठी बाहेर पडलो सिडींग मध्ये औटींग करायची हि माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मला मनातून खूपच भीती वाटत होती
पण भाऊजी सोबत असल्यामुळे थोडे सेफपण वाटत होते.
Continued…………..
Discussion (0)